CORONA

कोरोना : बीडमध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट! लॉकडाऊनमधील सर्वाधिक आकडेवारीची नोंद

कोरोना अपडेट बीड

बीड, दि. 4 : बीडमध्ये 26 मार्चपासून लॉकडाऊन लागलेला आहे. आज रात्री या लॉकडाऊनची मुदत संपणार आहे. लॉकडाऊनपुर्वी कोरोना रुग्णांची दररोज आढळणारी संख्या 300 ते 475 आसपास होती. मात्र दोन दिवसांपासून रुग्णसंख्येनं 400 चा टप्पा पार केला असून रविवारी तर तब्बल 486 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. प्रशासनाला 2959 जणांचे अहवाल प्राप्त झालेले होते. त्यातील 2473 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे समोर आले.

आज आढळून आलेल्या रुग्णात अंबाजोगाई तालुक्यातील 107, आष्टी 57, बीड 120, धारूर 8, गेवराई 30, केज 34, माजलगाव 37, परळी 43, पाटोदा 26, शिरूर 15, वडवणी 9 असे रुग्ण आढळले आहेत. यात 0 ते 18 या वयोगटादरम्यान 42 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे पालकांची जबाबदारी आणि चिंता वाढली आहे.
तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे…

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
Tagged