कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न असणार – आयजी डॉ.चव्हाण

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.10 : गुन्हे प्रतिबंध करणे, गुन्हे उघडकीस आणणे त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या तीन गोष्टीवर भर दिला जाणार आहे. पोलीस दलात काम करत असताना समजाचीही मदत महत्वाची असते. बेसिक कामावर फोकस असणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले. बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी (दि.10) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले की, कुठल्याही ठाण्यात तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करावा अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेली आहे. तसेच कारवाई करताना दिरंगाई होत असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी जास्तीत जास्त प्रशिक्षित करून सार्वजनिक शांतता अबाधित ठेवली जाईल. नव्यानेच आता सायबर गुन्हे घडत आहेत. यातील आरोपी हा समोर नसतो त्यास शोधण्यासाठी प्रशिक्षित स्टाफ महत्वाचा असून तो तयार केला जाईल. तसेच सायबर सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करण्यावर भर दिला जाईल.

सायबर, वाहतूक शाखेत संख्या वाढवणार
वाहतूक कोंडीचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. तसेच सायबर गुन्हे वाढल्याने मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे दोन्ही शाखेत कर्मचारी संख्या वाढवली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.

Tagged