बीड एलसीबी राहिले; सर्व ठाण्यांना ठाणेदार मिळाले!

न्यूज ऑफ द डे बीड


पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काढले नियुक्तीचे आदेश

बीड दि. 1 : जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक (beed police pi, api, psi transfer ordar) यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या शुक्रवारी (दि.30) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (nandkumar thakur) यांनी केल्या आहेत. यामध्ये जवळपास रिक्त असलेल्या सर्व ठिकाणी ठाणेदार देण्यात आले असून फक्त स्थानिक गुन्हे शाखेची नियुक्ती बाकी आहे. नियुक्ती दिलेल्या ठिकाणी तातडीने हजर होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (दैनिक कार्यारंभ, बीड)

यामध्ये पोलीस निरीक्षक अशोक काशिनाथ मोदीराज – मानव संसाधन विभाग बीड, सुनील रामराव नागरगोजे – पोलीस नियंत्रण कक्ष तर सहायक निरीक्षक समाधान गंगाधर पवार – पाटोदा पोलीस ठाणे, गोरखनाथ बाबासाहेब दहिफळे – परळी शहर, रामदास छबुराव पालवे – वाचक शाखा, माजलगाव उपविभाग, महेंद्रसिंग सुरेंद्रशिंग ठाकूर – बर्दापुर प्रवीण रुस्तम जाधव – संभाजीनगर, (दैनिक कार्यारंभ, बीड) केदारनाथ माणिकराव पालवे – शिवाजीनगर, गोरक्ष बबन पालवे – नियंत्रण कक्ष, मुस्तफा इस्माईल शेख – जनसंपर्क अधिकारी, अशोक नारायण खरात – शहर वाहतूक शाखा, आनंद शिवाजी कांगुने – डायल 112, किशोर पुरुषोत्तम चोरगे – पोलीस नियंत्रण कक्ष, गणेश अर्जुन मुंडे – स्थानिक गुन्हे शाखा, अमोल गणेश गुरले – बीड शहर तर (दैनिक कार्यारंभ, बीड) पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोरे – पोलीस नियंत्रण कक्ष, मनीषा गिरी – अंबेजोगाई ग्रामीण, गणपत जागडे – पेठ बीड, शिवाजी भारती – वाचक शाखा उपविभाग बीड, शैलेश शेजुळ – बीड ग्रामीण, सचिन दाभाडे – बीडीडीएस, बाबासाहेब खरात – पिंपळनेर स्थगिती, प्रमोद काळे – अमळनेर, शेखर औटे – टेक्निकल ॲनालीसेस सेल, संतोष नागरगोजे – परळी शहर, किरण पवार – बीड शहर, शिवाजी गोडे – शिवाजीनगर, नंदकुमार बबनराव ठोंबरे – वाचक शाखा, उपविभाग आष्टी येथे नियुक्ती देण्यात आली आहे. (दैनिक कार्यारंभ, बीड)

ठाणेदार म्हणून नियुक्ती
यामधे पोलीस निरीक्षक विश्वास रामचंद्र पाटील – जिल्हा वाहतूक शाखा, निरीक्षक मनीष मोहन पाटील – पाटोदा, बीड शहरचे निरीक्षक रवी श्रीहरी सानप – परळी शहर, संतोष एकनाथ खेतमाळस – आष्टी ठाणे, शिवाजी धोंडीबा बंटेवाड – माजलगाव ग्रामीण, देविदास भागवत गात – बीड सायबर ठाणे, अजिनाथ विठ्ठलराव काशीद – पेठ बीड ठाणे, मुकुंद काशिनाथ कुलकर्णी – बीड शहर ठाणे तर सहायक पोलीस निरीक्षक विलास भास्करराव हजारे – नेकनूर पोलीस ठाणे, महादेव किशन ढाकणे – अंभोरा पोलीस ठाणे, अमन भीमराव सिरसट – वडवणी, गणेश केशव धोक्रट- शिरूर, चंद्रकांत गोविंद गोसावी – अंमळनेर पोलीस ठाणे यांची ठाणे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

BEED SP OFFICE
Tagged