crime

अट्टल गुन्हेगार पकडला; राज्यभरात 38 गुन्हे दाखल

क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई शहर पोलिसांची कारवाई; गुन्हे उघड

अंबाजोगाई : जबरी चोर्‍या करणारा आणि राज्यभरात तब्बल 38 गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार अंबाजोगाई शहर पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलीस ठाण्यातून ताब्यात घेतला आहे.

 सुरेश उर्फ सुर्यकांत राम मुळे (रा.अंबाजोगाई) असे त्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. शहर पोलिसांनी मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याने 9 लाख रुपये सोयाबीनचा टेम्पो पळवला, नायायाधीशांच्या घरी व व्यापारी बालाजी भावठाणकर यांच्याकडे चोरी केल्याची कबुली दिली. परंतु मुद्देमाल अद्यापही पोलिसांना मिळू शकलेला नाही. या आरोपीविरूद्ध अनेक गुन्हे दाखल असून प्रत्येक हद्दीतील पोलिसांना हा आरोपी ताब्यात घ्यायचा आहे.

सोयाबीन भरलेला टेम्पो चोरी केल्याची कबुली
पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलीस ठाण्यात कुख्यात आरोपी मुळे हा बटाट्याच्या टेम्पो चोरी प्रकरणात अटक असल्याची माहिती मिळाली. त्याला संशयावरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी एका आडत व्यापार्‍याच्या दुकानासमोर 236 कट्टे सोयाबीन भरलेला टेम्पो गांधीनगर भागातील सुरेश मुळे याच्यासह त्याचे साथीदार राहुल प्रल्हाद बनसोडे, संजय उर्फ भीमा आबासाहेब आदमाने या तीन आरोपींनी टेम्पो जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव येथील बाळासाहेब आसाराम राऊत यांच्या शेतामध्ये उतरविला. गुप्त माहिती मिळाल्यानंतर राऊत यांनी या तिघांनी सोयाबीनचे कट्टे आमच्या शेतात उतरविल्याचे सांगितले. त्यानंतर राहुल बनसोडे, संजय आदमाने यांना ताब्यात घेतल्यानंतर या चोरीचा मास्टरमाइंड सुरेश मुळे असल्याचे सांगितले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक गोपाळ सूर्यवंशी, नरहरी नागरगोजे, गोविंद येलमाटे, किसन घोळवे यांनी हा गुन्हा उघड केला.

Tagged