डीवायएसपी सुनील जायभाय यांच्या पथकाची कारवाई
अंबाजोगाई : शहरातील रिंग रोडने कारमधून घेऊन जात असलेल्या गुटख्यासह 4 लाख 13 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाय यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.17) दुपारी 2 वाजता केली.
कैलास कचरू सोळंके (रा.हातोला ता.अंबाजोगाई), सुरज खानापुरे (रा.साळुंकवाडी ता.अंबाजोगाई) अशी आरोपींची नावे आहेत. यातील कैलास सोळंके हा कारमधून (क्र.एम.एच.24 ए.डब्ल्यू. 0344) तथागत चौकातून भगवान बाबा चौकाकडे रिंग रोडने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाय यांच्या पथकातील पोलीस कर्मचार्यांनी संशयित कार अडविली असता चालक कैलास सोळंके हा पसार झाला. कारची तपासणी केली असता गुटखा, पानमसाला आढळून आला. पोलिसांनी जप्त केलेल्या कारसह मोबाईलच्या आधारे सुरज खानापुरे याच्या सांगण्यावरून प्रतिबंधित असेलला गुटखा विक्री केला जात असल्याचे समोर आले. दोघे आरोपी फरार आहेत. दरम्यान, पोलिसांनी 1 लाख 10 हजार रुपयांचा गुटखा आणि कार, मोबाईल असा 4 लाख 13 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पो.कॉ.सतीश कांगणे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
नोट : बातमीतील छायाचित्र संग्रहित आहे.