beed chouk,

बीडच्या शिवतीर्थावरील रस्ता कामामुळे वाहतूक मार्गात बदल

बीड

बीड, दि. 18 : बीडच्या शिवतीर्थावरील रस्ता कामामुळे बार्शी रोडकडून बसस्टँडकडे येणार्‍या वाहनांच्या वाहतूक मार्गात दिनांक 18 जून शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून बीड पोलीसांनी बदल केला आहे. त्यासाठी पोलीसांनी एक प्रेसनोट प्रसिध्दीस दिली आहे. मात्र पोलीसांच्या या प्रेसनोटमुळेच वाहनधारकांची दिशाभूल होण्याची शक्यता अधिक असून वाहतूक कोंडी देखील होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांच्या सोईसाठी ‘कार्यारंभ’ काही पर्यायी मार्ग सुचवत आहे, त्या मार्गाचा वाहनधारकांनी वापर केल्यास त्यांची गैरसोय टळेल. मुख्यत्वे दुचाकी आणि रिक्षे या वाहनांनी शिवतीर्थावर न येता पर्यायी मार्गाने मार्गस्थ व्हावे. तरच वाहतूक कोंडी टळेल. बीडमध्ये वाहतूक कोंडी होणार नाही याची जबाबदारी तुमची- आमची सगळ्यांची असून सर्वांनी सहकार्य करायला हवे.

आधी वाहतूक शाखेने प्रसिध्दीस दिलेली प्रेसनोट पहा

वाहतूक शाखेने प्रसिध्दीस दिलेली प्रेसनोट

कार्यारंभ खालील प्रमाणे मार्ग सुचवत आहे.
अ) केवळ दुचाकी आणि तीनचाकी रिक्षे आणि कारसाठी
(यामार्गाने जड वाहनाला वीजेच्या तारा आणि विविध चौकात टर्न करण्यासाठी पुरेसा स्पेस नाही. त्यामुळे जड वाहनांनी या मार्गाचा वापर करू नये.)

1) बार्शी रोडकडून साठेचौकाकडे जायचे असल्यास
बार्शी रोड- राष्ट्रवादी भवन – शिवराज पान सेंटर चौक- एसपी ऑफीस समोरून माने कॉम्प्लेक्स – समाजकल्याण भवन समोरून युटर्न घेऊन बसस्टँड पाठीमागील रस्त्याने -संतोषी माता टॉकीज – साठे चौक मार्गे हवे तिकडे जाता येईल.

2) बार्शी रोड मार्गे महालक्ष्मी चौक औरंगाबादकडे (बीड शहराच्या बाहेर पडायचे असल्यास
बार्शी रोड- राष्ट्रवादी भवन – शिवराज पान सेंटर चौक- एसपी ऑफीस समोरून माने कॉम्प्लेक्स- नाट्यगृह- नगर नाका चौक- राजीव गांधी चौक- अंबिका चौक- मार्गे पुढे रिलायन्स पेट्रोलपंपने जालना रोडला लागता येईल.

ब) मोठी वाहने एसटी, ट्रॅव्हल्स व इतर तत्सम वाहनांसाठी
(या मार्गावर पोलीसांनी दुचाकी, रिक्षांना प्रवेश देऊ नये. अन्यथा शिवतीर्थाजवळ मोठ्या वाहनांना टर्न करण्यासाठी पुरेस स्पेस उपलब्ध होणार नाही.)

1) बार्शी रोडकडून बसस्टँडकडे जायचे असल्यास
एसटी बसेस बसस्टँडमध्ये जाण्यासाठी शिवतीर्थावर यावे लागेल. बस इथे आल्यानंतर उजव्या साईडने (राँग साईड) पोलीसांनी डायव्हर्शन काढले आहे त्या मार्गे बसस्टॅन्ड गाठावे लागेल.

2) बार्शी रोडकडून नगर रोडला जायचे असल्यास
अ) एसटी बसेससाठी शिवतीर्थावर नगर रोडकडे जाण्यासाठी डायव्हर्शन काढले आहे.

3) बसस्टँडमधून बस नगर रोडकडे जाणार असेल तर ही बस विभाग नियंत्रक ऑफिससमोरून (राँग साईडने) शिवतीर्थावर आणून तिथून नगर राँग साईडने जिल्हाधिकारी कार्यालयसमोरून डावी साईड पकडून नगरनाका चौक मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे लागेल.

4) औरंगाबादकडून-नगर रोडकडे जायचे असल्यास
अ) औरंगाबादकडून येतानाच या वाहनांना रिलायन्स पेट्रोल पंप शेजारून कॅनॉलरोडमार्गे नगर नाका चौकात येऊन पुढे मार्गस्थ व्हावे लागेल.

5) बीडच्या पूवर्र् भागातून पश्मिम भागात जायचे असल्यास
अ) दुचाकी, रिक्षे आणि चारचाकी वाहनांनी बशीर गंज चौकातून जिल्हा रुग्णालय किंवा शिवराज पान सेंटर चौकात येऊन पुढे मार्गस्थ व्हावे.

ब) सर्वेश्वर मंदिर रोडने अश्विनी लॉजच्या बाजुने जाणार्‍या रस्त्याने पुढे सम्राट चौक किंवा आपआपल्या सोईने अंबिका चौकाकडे जाता येईल.

पोलीसांनी वरील मार्गाचा आणि कार्यारंभच्या खालील सुचना अंमलात
आणल्या तर वाहतूक कोंडी टळेल.

1) एस.पी ऑफीसकडून शिवतीर्थकडे येणार्‍या मार्गावर दुचाकी, रिक्षे यांना अजिबात प्रवेश देऊ नये.

2) बशीर गंजकडून येणार्‍या वाहनांना बशीरगंज चौकातूनच शिवतीर्थाकडे प्रवेश देऊ नये.

3) साठे चौकातून संतोषी माता टॉकीजकडे जाणार्‍या राँग साईड वाहनांना प्रतिबंध घालावा.

4) संतोषी माता टॉकीजकडून बसस्टँडच्या पाठीमागून येणार्‍या रस्त्याने शिवतीर्थाकडे कुठलीच वाहने येऊ देवू नयेत. हा रस्ता ‘वन वे’ करावा. म्हणजे नगर रोडकडून आलेली वाहने साठे चौक मार्गे पुढे मार्गस्थ होतील.

5) शिवतीर्थावर सोळंके पेट्रोलपंपसमोर लावलेले होर्डींग तातडीने काढून घ्यावे.

6) सोळंके पेट्रोलपंपातूनही वाहतूक होऊ शकेल.

7) बसस्टँडकडून बार्शी रोडकडे जाणार्‍या वाहनांना नविन जिल्हा परिषदेच्या आवारात एन्ट्री देऊन पर्यायी एस.पी. ऑफिस शेजारून बाहेर मार्ग काढता येईल. (राँग साईड येणार्‍या एसटी बसेसमुळे ट्रॉफिक जाम होऊ लागली तर)

8) शिवतीर्थावर राँग साईडने बसेस मार्गस्थ करण्याऐवजी शिवतीर्थाजवळच नगर रोडवरील डीव्हायडर तात्पुरते हटवायला हवेत.

9) वाहतूक नियोजनासाठी शिवराज पान सेंटर चौक, एसपी ऑफीससमोरील माने कॉम्प्लेक्सकडे जाणारा चौक, सोळंके पेट्रोल पंप, फारूकी पेट्रोल पंप, बसस्टॅन्डच्या पाठीमागून जाणारा रस्ता, रुची बूक पॅलेस चौक, सम्राट चौक, अंबिका चौक, राजीव गांधी चौक, नगर नाका चौक, रिलायंन्स पंप चौक, बशीर गंज चौक या सर्व ठिकाणी सकाळी 6.30 ते रात्री 10 पर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवावा. पोलीसांकडे मनुष्यबळ नसेल तर स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते यांच्याकडे पोलीसांनी मदत मागावी.

आ.संदीप क्षीरसागर काय म्हणतात
बायपास टू बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिवतीर्थ चौकातील सिमेंट रस्त्याचे काम सुरु असल्याने सर्व वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा काही दिवस वापर करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेऊन रस्ते कामात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्यावी. शिवतीर्थ हा शहरातील सर्व मुख्य रस्त्यांना कनेक्ट करणारा चौक आहे, त्यामुळे येथील काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास आम्ही युध्दपातळीवर प्रयत्न करू, असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

पालकांसाठी महत्वाची सुचना
1) शिवतीर्थावरील रस्ते कामामुळे शहरातील वाहनधारकांनी नियोजित वेळेत पोहोचण्यासाठी किमान 15 मिनिटं आधीच घरून निघावे. खासकरून विद्यार्थ्यांच्या पालकांनी


Tagged