suside

तीनवेळा स्वॅब निगेटिव्ह येऊनही घरी जाऊ न दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : तीन वेळा स्वॅब निगेटिव्ह येऊनही आरोग्य प्रशासन 15 दिवसापासून घरी जाऊ देत नसल्याचा आरोप करत एका तरुणाने बीडमधील कोरोना सेंटरमध्ये (आयटीआय, बीड) आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली आहे.

आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरातील आयटीआय येथे कोविड केअर सेंटर असून त्याठिकाणी अनेकांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. यातील एका तरुणाने सोमवारी सकाळी माझा तीन वेळा स्वॅब निगेटिव्ह येऊनही मला 15 दिवसापासून घरी पाठविले जात नाही म्हणत सेंटरमध्ये गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्याला तेथील काही लोकांसह सुरक्षारक्षकांनी समजावून सांगितले. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शिवाजीनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी घटनास्थळी पोलिस निरीक्षक बिर्ला यांनी जावून संबंधित तरुणाची रुम बाहेरून समजूत काढली. तेव्हा त्या तरुणाने आपल्या खोलीचे दार उघडले. तेव्हा पोलिसांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली असता खोलीतील बाथरुममध्ये त्या तरुणाने दोर बांधला होता. पोलिसांनी संबंधित तरुणाची समजून काढली असून काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tagged