व्यापाऱ्याने दुकानातच केली आत्महत्या

न्यूज ऑफ द डे परळी

परळी : शहरातील एका व्यावसायिकाने स्वतःच्या दुकानातच शुक्रवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

प्रवीण प्रभाकर मालेवार (वय ४५) असे मयताचे नाव आहे. शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात असलेल्या गायत्री फिटिंग नावाच्या स्वतःच्या दुकानातच त्याने गळफास घेतला. आत्महत्या मागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांची फिर्याद घेत परळी शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शविच्छेदन करण्यासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मयत प्रवीण यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, आई आणि एक भाऊ असा त्यांचा परिवार आहे.

Tagged