फरार आरोपींच्या मालमत्तेवर येणार टाच

राशी भविष्य

फरार आरोपींच्या मालमत्तेवर येणार टाच
बीड, दि.17 : आरोग्य भरती गट क आणि गट ड प्रकरणात बीड जिल्ह्यातील अनेक बडे आरोपी अद्यापही फरार झालेले आहेत. पोलीसांनी आता त्यांचे बँक अकाऊंट आणि त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. त्यामुळे आरोपींना शरण येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
पुणे सायबर पोलीस दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत बीड जिल्ह्यातील 10 प्रमुख आरोपींना पोलीसांकडून अटक झालेली आहे. मात्र अद्यापही काही दलाल फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलीसांनी अशा आरोपींची एक यादी तयार केली असून त्यात बीडमधील जीवन सानप, राजेंद्र सानप यांच्यासह इतर काही आरोपींचा समावेश आहे. त्यांच्या इतर मालमत्तांचीही जिल्हाधिकार्‍यांकडून माहिती मागविण्यात येत असून लवकरच या मालमत्ता सील करण्याची कारवाई केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.