Solar Eclipse

सूर्यग्रहण : ज्योतिषशास्त्र काय सांगतयं?

न्यूज ऑफ द डे राशी भविष्य

ज्येष्ठ अमावास्येला जून महिन्यातील दुसरे ग्रहण रविवार, 21 जून 2020 रोजी लागणार आहे. सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण काय कोणत्या तीन राशींसाठी अत्यंत शुभ आहे? अन्य राशींच्या व्यक्तींना ग्रहण कसे असेल? काय काळजी घेणे फायदेशीर ठरेल? यावर उपाय काय? जाणून घेऊया…

    ज्येष्ठ अमावास्येला जून महिन्यातील दुसरे ग्रहण रविवार, 21 जून 2020 रोजी लागणार आहे. सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारताच्या काही भागात कंकणाकृती दिसणार असून, काही भागात ते खंडग्रास प्रकारात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण तब्बल 5 तास 48 मिनिटे चालणार आहे. पंचांगानुसार, या दिवशी मृगशीर्ष नक्षत्र असणार आहे. ग्रहणाच्या एका आठवड्यापूर्वी सूर्य ग्रह राशीबदल करून मिथुन राशीत विराजमान झाला आहे. बुध ग्रह गेल्या महिन्यापासून मिथुन राशीत आहे. त्यामुळे या ग्रहण कालावधीत आठ ग्रहांचा मिथुन राशीवर प्रभाव पडणार आहे. त्याचप्रमाणे शनी व गुरु, शुक्र अनुक्रमे मकर आणि वृषभ राशीत वक्री गेले आहेत. तर, मंगळ ग्रह राशीबदल करून मीन राशीत असणार आहे. राहु आणि केतु या ग्रहांची चाल नियमित वक्री असते. म्हणजेच या सूर्यग्रहणावेळी पाच ग्रह वक्री असणार आहेत. या सर्व खगोलीय घटना अद्भूत असून, सर्व राशीच्या व्यक्तींवर याचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे ग्रहण कोणत्या तीन राशींसाठी अत्यंत शुभ आहे? अन्य राशींच्या व्यक्तींना ग्रहण कसे असेल? काय काळजी घेणे फायदेशीर ठरेल? यावर उपाय काय? जाणून घेऊया…

मेष
ज्येष्ठ अमावास्येला लागणारे सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण मेष राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ मानले जात आहे. ग्रहणानंतर बहुतांश व्यक्तींना मोठे धनलाभ होण्याचे योग आहेत. हे सूर्यग्रहण आपल्यासाठी विशेष लाभदायक सिद्ध होईल. बहीण-भावंडे यांच्याशी नियमितपणे संपर्क ठेवावा. याशिवाय विशेष प्रभाव असणार्‍या व्यक्तींशी असलेला संपर्क वाढवावा. यातून फायदा होऊ शकतो. सर्व आघाड्यांवर हे सूर्यग्रहण आपल्यासाठी शुभफलदायी, लाभदायक, प्रगतीशील, सुखकारकच सिद्ध होणार आहे.

वृषभ
सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मिश्रित लाभ देणारे ठरेल. नोकरदार वर्गाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सावधगिरीने कामे पूर्ण करावीत. सूर्यग्रहण आपल्या द्वितीय स्थानी आहे. द्वितीय स्थान हे अर्थ व कुटुंबाचे स्थान मानले जाते. खर्चात वाढ होऊ शकते. कुटुंबावरील खर्चात कपात होईल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. डोळ्यांची काळजी घ्या. डोळ्यासंबंधी काही आजार, विकार असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन
सन 2020 मध्ये जून महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यातील पहिले सूर्यग्रहण मिथुन राशीतच लागणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी हे ग्रहण शुभ असेलच असे नाही. ग्रहणामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही प्रकारच्या आरोग्य तक्रारींसाठी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. वैद्यकीय सल्ला काटेकोरपणे पाळला पाहिजे. आर्थिक आघाडीवर सर्वच गोष्टी सामान्य असतील असे नाही. काही प्रमाणात नुकसान सोसावे लागू शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पथ्यपाणी, औषधे चुकवू नये.

कर्क
सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण आपल्या राशीच्या 12 व्या स्थानी आहे. बारावे स्थान नुकसान दर्शवते. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हे सूर्यग्रहण प्रतिकूल ठरू शकते. कोणत्याही प्रकारचे वाहन किंवा जागेसंबंधीचे व्यवहार करू नयेत. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे हिताचे ठरेल. पथ्यपाणी, औषधे चुकवू नये. एखाद्या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळेलच असे नाही. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक आघाडीवर काही प्रमाणात नुकसान सोसावे लागू शकते.

सिंह
सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ मानले जात आहे. पैसे कमवण्याच्या विविध उत्तम संधी ग्रहणानंतर आपल्याला मिळतील. प्रदीर्घ काळापासून अपूर्ण राहिलेली मनातील सूप्त इच्छा पूर्ण होण्याचा काळ आला आहे. संपर्कात असलेल्या व्यक्तींशी असलेला संबंध आणि मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याशी असलेले नातेसंबंध सूर्यग्रहणानंतर अधिक घट्ट होण्यास सुरुवात होईल. आर्थिक आघाडीवरील स्थिती मजबूत होण्याचा योग आहे. एकूणच पाहता, सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हे सूर्यग्रहण शुभफलदायी सिद्ध होऊ शकते.

कन्या
सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहणाचा कन्या राशीच्या व्यक्तींवर संमिश्र प्रभाव पडेल. मान विचलित राहील. हितशत्रूंचा त्रास संभवतो. खर्चात वाढ होईल. अचानक आलेल्या खर्चांमुळे चिंता वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणावरही विनाकारण टीका करू नका. आध्यात्मिक विषयातील आवड वाढेल. प्राप्त परिस्थिती स्वीकारून आव्हानांचा सामना करा. शक्यतो कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच घेतलेला वैद्यकीय सल्ला हिताचा ठरेल. पथ्यपाणी, औषधे चुकवू नका.

तुळ
सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण ज्येष्ठ अमावास्येला आहे. या ग्रहणाचा तुळ राशींच्या व्यक्तीवर संमिश्र प्रभाव राहील. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी वाद घालू नका. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. पथ्यपाणी, औषधे चुकवू नका. वेळीच घेतलेला वैद्यकीय सल्ला हिताचा ठरेल. संगीत आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठीचा काळ उत्तम जाईल. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करा.

वृश्चिक
ज्येष्ठ अमावास्येला लागणारे ग्रहण वृश्चिक राशीच्या 8 व्या स्थानी असणार आहे. ग्रहणानंतर हाती घेतलेली कामे आणि जबाबदार्‍या सावधगिरीने पार पाडाव्या लागतील. संसर्गजन्य आजारांपासून, रोगांपासून दूर राहा. कौटुंबिक आणि आर्थिक पातळीवर व्यवहार करताना काळजीपूर्वक करावे लागतील. समजुतीने, विचारपूर्वक कामे करावीत. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम कालावधी अजिबात नाही. श्वसनासंदर्भातील आजारांकडे विशेष लक्ष द्यावे. पथ्यपाणी, औषधे चुकवू नये. कोणत्याही प्रकारच्या आरोग्य तक्रारींसाठी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल.

धनु
ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला लागणारे सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण धनु राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र फलदायी ठरणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या सूर्यग्रहणामुळे उद्भवलेल्या समस्या, अडचणी या ग्रहणानंतर हळूहळू दूर होऊ लागतील. कार्यालयातील वरिष्ठांबरोबर वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. जबाबदार्‍या वाढतील. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे हिताचे ठरेल. पथ्यपाणी, औषधे चुकवू नये. कोणत्याही प्रकारच्या आरोग्य तक्रारींसाठी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. वैद्यकीय सल्ला काटेकोरपणे पाळला पाहिजे.

मकर
सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण ज्येष्ठ अमावास्येला आहे. या ग्रहणाचा मकर राशीच्या व्यक्तींवर संमिश्र प्रभाव पडेल. कामाचा ताण वाढेल. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यक्षेत्रातील आपला प्रभाव वाढेल. द्विधा मनस्थिती तयार होईल. बचत कमी झाल्याने चिंता वाढेल. मन खिन्न होईल. वादविवाद टाळावेत. धर्म-कर्मातील आवड वाढेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. पथ्यपाणी, औषधे चुकवू नका. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करा.

कुंभ
ज्येष्ठ अमावास्येला होणारे सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र फलदायी ठरेल. मानसिक तणाव वाढू शकतो. मन खिन्न होईल. वादविवाद टाळावेत. ध्यानधारणा, साधना फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये कटुता येऊ शकते. नवीन रिलेशनशिप सध्यातरी नको. आर्थिक आघाडी सामान्य राहील. विशेष लाभाचे अद्यापतरी योग नाहीत. आरोग्याची काळजी घ्यावी. पथ्यपाणी, औषधे चुकवू नका. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करा.

मीन
ज्येष्ठ अमावास्येला लागणारे सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण मीन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ आहे. कौटुंबिक पातळीवर सावधगिरी बाळगायला हवी. ग्रहणानंतर अनेक फायदे मिळण्याचा योग आहे. ग्रहणाच्या शुभ प्रभाव आपल्या सर्व कार्यांत आपल्याला मनोवांच्छित फळ, यश देणारा सिद्ध होईल. ग्रहणानंतरच्या कालावधीत दीर्घ काळापासून प्रलंबित राहिलेली काही कामे मार्गी लागून पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. सूर्यग्रहणाचा प्रभाव आपल्या आरोग्यावर पडू शकतो. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. व्यापारी आणि नोकरदार वर्गाला हे सूर्यग्रहण उत्तम फायदा मिळवून देणारे सिद्ध होईल.

हे उपाय करावेत
सूर्यग्रहणाच्या स्पर्श ते समाप्ती या कालावधीत धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण, नामस्मरण, जप, आराधना करावी. सकारात्मकता अंगी बाणवून मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. ग्रहणकाळात महामृत्यूंजय मंत्रांचा जप करावा. ग्रहण समाप्तीनंतर वस्त्र, फळे, शक्य असल्यास धनाचे दान करणे हिताचे ठरेल. ग्रहण काळात पूजा आणि इतर धार्मिक कार्ये करू नयेत. ग्रहण काळात जेवण बनवणे आणि खाणेही अनेकजण टाळतात. ग्रहण काळात झोपू नये. भगवंताचे नामस्मरण करावे. सूर्यमंत्र, गायत्री मंत्रांचा जप करावा, असे सांगितले जाते.

Tagged