जीएसटीमध्ये वाढ; रोजच्या वापरातील ‘या’ वस्तुंच्या किंमती वाढणार

देश विदेश न्यूज ऑफ द डे बीड

नव्या वर्षात होणार महागाईचा भडका

मुंबई : इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झालेला असून महागाईचा भडका उडाला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने दैनंदिन वापरातील वस्तुंच्या उत्पादनावरील सामानाच्या जीएसटीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ सोसावी लागणार असून नव्या वर्षात महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त जात आहे.

केंद्र सरकार याआधी चप्पल-कपडे आणि गारमेंट्सवर पाच टक्के जीएसटी आकारत होती. मात्र, आता यामध्ये वाढ केली आहे. यापुढे यावरील जीएसटी पाच टक्केवरुन वाढवून १२ टक्के करण्यात आला आहे. नवे दर २०२२ पासून लागू होणार आहेत. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने याबातची घोषणा केली आहे. त्यामुळे नव्या वर्षांत कपडे आणि चप्पल खरेदी करणे महागणार आहे. सरकारच्या या निर्णायावर क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचा कापड उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ आणि मालवाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे या उद्योगाला आधीच अडथळे येत आहेत.

Tagged