corona

बीड जिल्ह्यात बीड तालुका आघाडीवर!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : सोमवारी कोरोना बाधितांचा आकडा थोडाफार कमी झाला होता. मात्र मंगळवारी (दि.27) पुन्हा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यात 1 हजार 297 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे.
       आरोग्य विभागाला मंगळवारी (दि.27) चार हजार 397 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 297 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 100 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये बीड तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बीड-313 अंबाजोगाई 206, आष्टी 138, धारूर 52, गेवराई 84, केज 171, माजलगाव 44, परळी 85, पाटोदा 77, शिरूर 82 आणि वडवणी तालुक्यात 45 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी 

Tagged