विजेच्या धक्क्याने दोन ठार

गेवराई न्यूज ऑफ द डे

गेवराई : विजेचा धक्का लागून दोन वेगवेगळ्या घटनेत गेवराई तालुक्यात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना सोमवारी घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसात नोंद झाली आहे.

पहिली घटना गेवराई शहरातील घुमाडे गल्ली येथे आज (दि.22) दुपारी घडली. यात बांधकाम करत असताना अचानक विजेच्या वायरचा शॉक लागून एका 52 वर्षीय बांधकाम कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. रामकिसन रोहिदास गायकवाड, (वय 52, रा.शिवाजीनगर) असे मयताचे नाव असून घुमाडे गल्लीत भगवान घुमाडे यांच्या घरामध्ये बांधकाम सुरु होते.

दुसरी घटना, गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे घडली आहे. दत्ता राम घाडगे (16) या शाळकरी मुलास पाण्याची विद्युत मोटार सुरू करत असताना अचानक शॉक त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी गेवराई पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. दोघांच्या मृत्यूच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Tagged