भारतीय अपंग संघाने जागतिक क्रिकेट मालिका जिंकली

खेळ न्यूज ऑफ द डे बीड

मंत्री धनंजय मुंडेंनी केले संघाचे अभिनंदन

औरंगाबाद : भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र असलेल्या ज्योतिराम घुलेच्या नेतृत्वात बांग्लादेश विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2ः1 असा विजय मिळवत मालिका काबीज केली.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत भारताने बांगलादेशचा दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या वेबेन दासने फलंदाजी करताना 57 धावा करून संघाचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण याच दरम्यान प्रतिभावान युवा गोलंदाज अभिषेक शुक्लाने आपल्या मारक गोलंदाजीने बांगलादेशच्या तीन फलंदाजांना बाद करत त्यांचा विजयाचा बेत उधळला. भारताच्या विजयासह अभिषेकच्या कामगिरीबद्दल क्रिडा विश्चात आनंदाचे वातावरण आहे.

मंत्री धनंजय मुंडेंनी केले संघाचे अभिनंदन
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र असलेल्या ज्योतिराम घुलेच्या नेतृत्वात भारताने सामना जिंकला. सर्व खेळाडूंचे मनस्वी अभिनंदन व पुढील कसोटी व टी 20 सामन्यांसाठी शुभेच्छा, असं म्हटलं आहे.

Tagged