बीड दि.29 : घरगुती मिटर घेण्यासाठी सर्व्हे रिपोर्ट बदलून देण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ याने लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी बीड लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांचे नावे घरगुती वापराचे मिटर घेण्यासाठी सर्व्हे रिपोर्ट बदलून देण्यासाठी शरद सुरशे घुटे (वय 33 वरिष्ठ तंत्रज्ञ, पथक कार्यालय, म.रा.वि.वि.क मर्यादित, मस्साजोग ता.केज) याने पंच साक्षीदार समक्ष पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवार्ठ लाचलचुपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भारत राऊत, निरीक्षक रविंद्र परदेशी यांच्यासह आदींनी केली.