Child marriage

बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल

क्राईम बीड महाराष्ट्र

गेवराई तालुक्यातील प्रकार
बीड : अल्पवयीन मुलगी असतानाही तिचा मंदिरामध्ये जावून गुपचूप विवाह लावून दिले. तसेच विवाहामध्ये उपस्थिती दर्शवली. या प्रकरणी वधूवरांच्या आई, वडील, भटजीसह चाळीस वर्‍हाडी मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई येथील एका अल्पवयीन मुलीचा गुरुवारी (दि.11) सकाळी 8 च्या सुमारास देवप्रिंपी येथील डोंगरावर महादेवाच्या मंदिरामध्ये विवाह संपन्न झाला. याची माहिती ग्रामसेवक रोहिणीकांत घसिंग यांना झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी गेवराई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2007 कायद्यन्वेय सतिष खनाळ, सुनिता खनाळ, सुंदर खनाळ, लहू मंचरे, शिवाजी मंचरे, मंदाबाई मंचरे, अंकुश मंचरे, गोपिनाथ मंचरे यांच्यासह अज्ञात भटजी व तीस ते चाळीस वर्‍हाडी मंडळींवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि.टाकसाळ हे करत आहेत.

Tagged