dada-bhuse

कृषी मंत्री दादा भुसे बीडमध्ये; बोगस बियाणे प्रकरणी कारवाई करणार का?

बीड राजकारण शेती

बीड : राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे बीड दौर्‍यावर असून रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह बीड येथे दाखल झाले आहेत. ते सोमवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाचा आढावा घेणार आहेत.

कृषी विभागाचा आढावा बैठकीस जिल्हाधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा सहकारी निबंधक, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक व इतर अधिकारी उपस्थित असणार आहे. या आढावा बैठकीनंतर बीड जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारीवरुन कृषी मंत्री भुसे हे बोगस बियाणे पुरवठा करणार्‍या कंपनीविरोधात कारवाई करणार का? याकडे शेतकर्‍यांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, बीडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना अधिकारी, पदाधिकार्‍यांशी शेतकर्‍यांच्या अडीअडचणीबाबात चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Tagged