antigen test ashti dist beed

कोरोना संशयितांनाच रुग्णालयात उपचारासाठी चाचणी बंधनकारक

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

खासगी वैद्यकीय व्यवसायिकांसह रुग्णांना दिलासा

बीड : खाजगी नर्सींग होममध्ये भरती होणार्‍या व तपासणीसाठी येणार्‍या सर्वच रूग्णांना गुरुवारपासून कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. या आदेशात अंशतः बदल करण्यात आला असून आता केवळ कोरोनाची लक्षणे असणार्‍या अर्थात संशयितांनाच शासकीय रूग्णालयात चाचणी करावी लागणार आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयामुळे खासगी वैद्यकीय व्यवसायिकांसह रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

  खाजगी नर्सींग होममध्ये उपचार घेण्यासाठी येणार्‍या रूग्णांची कोरोना चाचणी न करताच त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे कोरोनाचा वेगाने प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातून नर्सींग होमचे कर्मचारीही बाधित होतात. त्यामुळेच खाजगी नर्सींग होममध्ये दाखल होणार्‍या रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी तर बाह्यरूग्ण म्हणून आलेल्या रूग्णांची रॅपीड अ‍ॅन्टीजेन चाचणी बंधनकारक केली होती. परंतू आता या आदेशात अंशतः बदल करून केवळ सारी, कोरोना आजाराची लक्षणे असलेल्या रूग्णांचीच चाचणी करण्याचे सुधारित आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात अ‍ॅटीजेन तपासण्याची 24 तास सुविधा नसते. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय आधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांवरही चाचणी करूनच उपचार करावेत का? अशा अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने आदेशात बदल करून खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांसह रुग्णांना दिलासा दिला आहे.

Tagged