लॉकडाऊन काळातील सर्वाधिक नोंद
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा सोमवारी स्फोट झाल्यासारखी परिस्थिती आहे. लॉकडाऊन काळातील सर्वाधिक रूग्णसंख्येची नोंद झाली. कोरोना पाचशे पार गेल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. बाधितांमध्ये बालक, तरुणांचा मोठा आकडा आहे.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, 2 हजार 225 अहवाला प्राप्त झाले असून त्यापैकी 1 हजार 680 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तब्बल 575 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 150, अंबाजोगाई तालुक्यात 127, आष्टी 80, धारूर 11, गेवराई 18, केज 50, माजलगाव 35, परळी 48, पाटोदा 29, शिरूर कासार 24, वडवणी 3 असे रूग्ण आढळून आले आहेत. विशेष 0 ते 18 वयोगटातील 50 रूग्ण असल्यामुळे पालकांची चिंता वाढविणारी आकडेवारी देखील समोर आली आहे.