ACB TRAP

लाचखोर ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात!

आष्टी क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.19 : आदर्श ग्रामसेवकांचा बीड येथील यशवंतराव नाट्यगृहामध्ये मंगळवरी (दि.19) सत्काराचा कार्यक्रम सुरू असतानाच महिला ग्रामसेवकाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी अमोरा पोलीस ठाण्यात लाचखोर ग्रामसेविकेसह एका एजंटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सोनाली अरविंद साखरे (वय 39,रा.गवंडी गल्ली, खर्डा, ता.जामखेड, जि.अहमदनगर) असे ग्रामसेविकेचे नाव आहे. त्या आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट येथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रमसेवक म्हणून कार्यरत होत्या. त्यानी तक्रारदार यांचे वडिलांचे निधन झाले असून त्यांचे नावावरील प्लॉटचा उतारा तक्रारदार यांनी मागितला होता. सदर उतारा काढून देण्यासाठी लोकसेविका सोनाली साखरे यांनी तक्रारदार यांचेकडे तीन हजारांच्या लाचेची मागणी केली. सदरील लाच खाजगी इसम चांगदेव दळवी (रा.पिंपळगाव घाट, ता.आष्टी जि.बीड) यांनी लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कोठडी अमोल धस, अमंलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश मेहेत्रे यांनी केली.

Tagged