मोठी बातमी… सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु

बीड

कार्यारंभच्या लढ्याला अखेर यश
बीड, दि. 20 : राज्यातील शाळा सुरु करा म्हणून दैनिक कार्यारंभने पालकांची आणि विद्यार्थ्यांची बाजू लावून धरली होती आज अखेर याला यश मिळाले आहे. राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सोमवारपासून सर्व आता सुरु होणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याबाबतचे सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच, राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समंती दिली असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोलताना म्हणाल्या की, सर्वच स्तरांतून शाळा सुरु करण्याच्या संदर्भात मागणी होत होती. तसेच, शाळा सुरु करण्यासंदर्भातील अधिकार स्थानिक स्तारावार देण्याची मागणी होत होती. अशातच आजच्या बैठकीत सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सोमवारपासून शाळा सुरु करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्यात येणार आहेत.

बीडमध्ये मोठं आंदोलन
बीडमध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी स्कूल चले हम आंदोलन करून 17 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद केला होता. दैनिक कार्यारंभने शाळा सुरु होण्यासाठी पुरक भुमिका घेत सरकारला विविध सवाल केले होत. आज अखेर सर्वांचे प्रयत्न फळाला आले आहेत.

कार्यारंभने विविध बातम्या प्रकाशीत करून सरकारला जाब विचारला होता.