समीर शर्मा

ये रिश्ता क्या केहलता है फेम समीर शर्माची राहत्या घरी आत्महत्या

देश विदेश न्यूज ऑफ द डे मनोरंजन महाराष्ट्र

मुंबई: सुशांत सिंह राजपतूच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता टीव्ही अभिनेता आणि मॉडेल समीर शर्मानं बुधवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. समीरचा मृतदेह मालाड येथे किचनमधील सिलिंगला गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरनं मालाडमधील घरं फ्रेबुवारीमध्ये भाडे तत्वावर घेतले होते. बुधवारी रात्री इमारतीच्या वॉचमननं समीरचा मृतदेह पाहिला आणि त्याच्या शेजार्‍यांना याबाबत कळवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीरनं दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी.

अद्याप पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. समीरनं प्रसिद्ध मालिका कहानी घर घर की, क्यू की सांस भी कभी बहू थी, ये रिश्ता क्या केहलता है, अशा मालिकांमध्ये काम केले होते.

Tagged