सहकारमहर्षी ॲड. आनंदराव उर्फ बापू चव्हाण यांचे निधन

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई : येथील सुपरिचित असलेले ज्येष्ठ नेते, ॲड. आनंदराव उर्फ बापू चव्हाण यांचे आज (दि.३०) सकाळी ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते.

स्व. आनंदराव उर्फ बापू चव्हाण यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) सायंकाळी ६ वाजता मूळ गावी हातोला (ता. अंबाजोगाई) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. येथील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते ॲड. जयसिंग चव्हाण यांचे ते वडील होत. दरम्यान, मागील अनेक दशकांपासून अंबाजोगाई तालुक्याच्या कृषी, सहकार, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांत निःस्पृह भावनेने कार्य करत होते.

Tagged