महाराष्ट्रातील या खासदारांचा रिपोर्ट कोरोना positive

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

खासदार यांचं कुटुंब देखील positive असल्याचं आज समोर आल्याने खळबळ उडाली आहे

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. खासदार राणा यांच्याशिवाय कुटुंबातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं अहवाल आल्यानंतर स्पष्ट झालं आहे. या सदस्यांमध्ये राणांच्या मुलांचाही समावेश आहे. आणि आज नवनीत राणा यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या बातमीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पती आमदार रवी राणा हे नागपूरला त्यांच्या आई वडिलांच्या सेवेत आहेत. अशात नवनीत आणि रवी राणा यांच्या मुलाला आणि मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय नवनीत राणा यांचे सासू-सासरे म्हणजे रवी राणा यांचे आई वडील नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल आहेत. त्यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी आहे.
बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांचे वडील आणि खासदार नवनीत राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट कालच पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्वभूमीवर राणा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत 10 जणांना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये आमदार-खासदार पती-पत्नींच्या मुलांचा समावेश आहे.
आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी आणि लक्षणं असल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
या आधी रवी राणा आणि नवनीत राणा यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मात्र, राणा दाम्पत्यांचं चुकीचे थ्रोट सॅम्पल घेतल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अमरावती जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबाबत आमदार रवी राणा यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे तक्रार केली होती.

आमदार रवी राणा यांना ताप आल्याने अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब जिल्हा कोविड रूग्णालयाच्या टीम मार्फत घेण्यात आले होते. हे स्वॅब तपासणीसाठी नागपूर येथील AIIMS मध्ये पाठवण्यात आले होते. मात्र, स्वॅब सॅम्पल चुकीचे असल्याचे AIIMS तज्ज्ञ डॉ. मीना यांनी खासदार नवनीत राणा यांना फोन करून माहिती दिली होती. तसेच त्यांचे सॅम्पल परत पाठवण्यास सांगितले होते. यापूर्वीही 40 ते 45 स्वॅब हे चुकीच्या पद्धतीने घेतल्याने ते नागपूर येथील AIIMS ने रिजेक्ट केले होते.

Tagged