accident

कर्तव्यावर असलेल्या महामार्ग पोलीस कर्मचार्‍यास पिकअपने उडवले

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

 बीड दि.11 : भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत महामार्ग पोलीस कर्मचारी हे गंभीररित्या जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.11) रात्री 7 च्या सुमारास चौसाळा परिसरात राष्ट्रीय महामार्गावर घडली. त्यांना उपचारासाठी बीड येथील फिनिक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूूूदाम वनवे असे पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. मंगळवारी ते कर्तव्यावर होते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा परिसरात वाहनांवर कारवाई करत होते. यावेळी एका भरधाव आलेल्या पिकअपने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये वनवे हे गंभीररित्या जखमी झाले. सोबत असलेल्या कर्मचार्‍यांनी त्यांना तत्काळ बीड येथील फिनिक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सदरील पिकअप पकडून नेकनूर पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून नेकनूर पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Tagged