बीड, दि.22 ः शिवसेनेचे 33 प्रहारचे 2 आणि एक अपक्ष असे मिळून गुवाहाटीच्या रॅडीसन ब्ल्यूमध्ये 37 आमदार आहेत. याशिवाय आणखी चार ते पाच आमदार शिवसेनेचे दाखल होतील. आणि काँग्रेसचे चार ते पाच आमदार आणखी आम्हाला येऊन मिळतील, अशा प्रकारे महाविकास आघाडी सरकारमधील 50 जण एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, अशी माहिती राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
औरंगाबादचे शिवसेना आमदार संजय सिरसाट हे ह्यांनी देखील फोनद्वारे माध्यमांशी संपर्क साधला. त्यावेळी सिरसाट म्हणाले, शिवसेनेचे एकूण 40 आमदार आमच्यासोबत असतील. सध्या हॉटेलमध्ये 37 आमदार आहेत, असेही सांगितले.
संदीपान भुमरे यांनीही फोनद्वारे माध्यमांना संपर्क केला. त्यात ते म्हणाले, सगळे आमदार आनंदात आहेत. उध्दव साहेब काय बोलत आहेत हे मला माहिती नाही, परंतु आता आमचे साहेब शिंदे साहेब आहेत. मला चंद्रकांत खैरे यांनी फोन केला होता. त्यांना स्पष्ट सांगितले आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. ते म्हणतील तोच आमचा निर्णय आहे. आमचं म्हणणं एकच होतं की कामं व्हायला पाहीजेत, मतदार संघातील विकास कामांना निधी मिळायला पाहीजे होता. आता शिंदे साहेब सांगतील तोच निर्णय होणार. माझे पहिल्यापासुनचे तेच नेते आहेत. मी एकटा मंत्री इथे नाही तर सहा मंत्री इथे आले आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी बांधील आहोत. मला वैयक्तिक काही लागत नव्हतं. फक्त कामे व्हायला पाहीजे होती हा आमचा हेतू होता. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून त्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात होत्या. एकनाथ शिंदे असा एक माणूस आहे की ते आमचे कामं करतात. आम्हाला कामं करताना वारंवार अडचणी येत होत्या. त्या आम्ही उध्दव साहेबांना सातत्याने सांगत होतो, पण उपयोग होत नव्हता. ज्यावेळी 40 आमदार इथे आले त्याला काहीतरी कारण असेल ना… आम्ही विनाकारण इथे आलेलो नाहीत. आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादीकडून खूप त्रास होत होता, असेही संदीपान भुमरे म्हणाले.सातव्या माळ्यावरून उडी मारणार,
संदीपान भुमरेंची क्लिप व्हायरल
उध्दव साहेबांनी सांगितले तर मी सातव्या मजल्यावरून उडी मारायला तयार आहे, असे प्रतिपादन केलेली एक क्लिप संदीपान भुमरेंची व्हायरल झाली आहे. त्यामुळे हेच का ते संदीपान भुमरे असा सवाल विचारला जातोय.
गट स्थापन करण्याची प्रक्रीया सुरुवातीलाच झाली
शिवसेनेचा गट स्थापन करण्याची प्रक्रीया सुरुवातीलाच झाली, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. आम्ही सेनेला पाठींबा दिला होता. पण आता सेनेच्या 75 टक्के आमदारांनी इकडे धाव घेतली आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत आलो. माझी काही वैयक्तिक नाराजी नव्हती. शिवसेनेच्या आमदारांची कामं होत नव्हती, हीच सगळ्यांची मुख्य अडचण होती, असेही बच्चू कडू म्हणाले.
राज्यपालांना कोरोनाची लागण