vaccines

न्यूमोनियावरील लस मेड इन पुणे

देश विदेश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

न्यूमोनियावर लस बनविण्यात भारताला यश

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. कोरोनावरील लस निर्माण करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. मात्र, या सगळ्यात कोरोना विषाणू भयानक रूप धारण करत असला तरी, कोरोनाग्रस्तांना न्यूमोनियाने त्रस्त व्हायची वेळ आली आहे. कोरोनाप्रमाणेच इतरही आजार आहेत ज्यावर लस बनवण्याची गरज आहे आणि त्यापैकीच न्यूमोनिया हा एक आजार होता.

भारतात न्यूमोनियाचं वॅक्सीन विकसित कऱण्यात आलं असून त्याला बुधवारी डिजीसीआय ची मंजुरी मिळाली आहे. क्लिनिकल चाचणीचा पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने यशस्वीरित्या पूर्ण केला असून त्याचा आढावा डीजीसीआयने घेतला आहे. त्यानंतर ’न्यूमोकोकल पॉलिसाकारिडे लस’ ही लस बाजारात आणण्यासाठी कंपनीला परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या लसीचा उपयोग न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी करण्यात येणार आहे. चाचणीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर कंपनीने ही लस बनवून विक्री करण्याची परवानगी मागितली.

2013 मध्ये या लसीची चाचणी 34 वर्ष वयोगटातील लोकांवर घेण्यात आली आणि नंतर 12 ते 5 वर्ष आणि ऑक्टोबरमध्ये 6 ते 8 आठवड्यांच्या बाळांवर ही चाचणी करण्यात आली. ती यशस्वी झाली. त्यामुळे न्यूमोनियावरील लस कधीही बाजारात विक्रीसाठी आणली जाऊ शकते.

Tagged