collector office beed

खाजगी दवाखान्यांना बीड जिल्हा प्रशासनाची तंबी

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि. 16 : बीड शहरातील एकाच दवाखान्याच्या संपर्कातून 10 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आज एक पत्रक जारी करून खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना कारवाई करण्याची तंबी दिली आहे.


निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचे रुग्ण वाढत असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले असता काही रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे निदर्शनास येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी व औषधे विके्रत्यांनी कोरोनाची लक्षणे दिसणारी व कोरोना संशयित व्यक्तींची माहिती आरोग्य विभागास वेळेवर देणे बंधनकारक आहे. परंतु अनेकजण खासगी वैद्यकीय व्यवसायिक वेळेवर माहिती देत नसल्याचे निदर्शनास आले असून यापुढे माहिती देण्यास कुचराई केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे पत्रकात नमूद केले आहे.

Tagged