accedent

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात पैलवानाचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी

सिरसाळा दि.5 : ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातामध्ये पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास सिरसाळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली. दरम्यान याच चौकात आठवड्यात तीन अपघातात तिघांचा मृत्यू झालेला आहे. या चौकात वाहतूक पोलीसांची कायस्वरुपी नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

पैलवान बाबुराव बळीराम सलगर (वय 38 रा.मालहिवरा) हे दुचाकीवरुन जात होते. यावेळी ऊसाच्या ट्रॅक्टरचा व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात पैलवान बाबुराव सलगर यांचा मृत्यू झाला. बाबूराव सलगर हे ग्लोबल परळी तेथे होमगार्ड या पदावर कार्यरत होते. तसेच सिरसाळा येथील भर चौकातील वाहतूक कोंडीमुळे एका आठवड्यात तिघांचा अपघातात मृत्यू झालेला आहे. ऊस वाहतूक करणार्‍या तसेच अवजड वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

Tagged