rahul rekhawar

सामायिक शेत जमीनीचा विमा उतरवितांना शेतकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांची सुचना

न्यूज ऑफ द डे बीड शेती

बीड, दि.23 : सामायिक शेत जमीनीवरून शेतकर्‍यांमध्ये विमा उतरविताना मतभेद व वादविवाद होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी अशा शेतकर्‍यांसाठी व सीएससी केंद्र चालकांसाठी सुचनांचे प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे.
जिल्हाधिकारी राहूल रेखावार दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हणतात, प्रधानमंत्री पीक विमा योजना बीड जिल्ह्यात 17 जुलै 2020 पासुन राबविण्यात येत आहे. जिल्हयातील शेतकर्‍यांशी चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे की, ज्या ठिकाणी सामायिक शेत जमीन आहे अशा ठिकाणी एकाच शेतकर्‍यांनी 7/12 वर नोंद असलेल्या संपूर्ण क्षेत्राचा विमा उतरविला असेल तर सामुहिक क्षेत्रात सहभागी ईतर समाविष्ट शेतकर्‍यांना पुढे विमा उतरवता येत नाही. त्यामुळे सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांनी त्यांच्या हिश्यामध्ये येत असलेल्या क्षेत्रा इतक्याच क्षेत्रावर विमा उतरावा म्हणजे अन्य सहभागी शेतकर्‍यांनाही त्याच गट नं./सर्व्ह नंबरमध्ये विमा उतरवता येईल किंवा अन्य शेतकर्‍यांच्या सहमतीने कोणीतरी एका शेतकर्‍याने संपूर्ण क्षेत्राचा विमा उतरावा. अन्य शेतकर्‍यांच्या सहमती शिवाय त्यांच्या क्षेत्रावर आपण विमा उतरवणे बे-कायदेशीर आहे. मात्र अशी चूक झाली असल्यास संबंधीत सी.एस.सी केंद्र धारकाला सुचवून त्यांच्या मार्फत सीएससी केंद्र स्तरावर किंवा जर अर्ज आणि विमा हफ्ता रक्कम विमा कंपनीस पाठवली गेली असल्यास विमा कंपनी स्तरावर पूर्वी केलेली चूक दुरुस्त करता येवू शकते. त्यासाठी संबंधित शेतकर्‍यांनी तसेच अर्ज संबंधित सी एस सी केंद्र चालकाकडे करावा. तसेच सीएससी केंद्र चालकाने सुद्धा यापुढे संयुक्त खात्यांच्या बाबतील विमा प्रकरण भारताना ईतर शेतकर्‍यांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे, असे नमूद करण्यात आले आहे.

Tagged