DHANANJAY MUNDE

ना. धनंजय मुंडेंनी प्रत्येक खासगी रुग्णालयात ठेवले दोन स्वयंसेवक

कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे परळी

सेवाधर्मासाठी सुक्ष्म नियोजन : रुग्णांची देखभाल, भोजनव्यवस्था, इंजेक्शनसाठी परळीतील प्रत्येक रुग्णालयात दोन स्वयंसेवक नियुक्त

  • धनंजय मुंडेंकडून महिलांसाठी 100 बेडचे स्वतंत्र कोविड केअर सेंटर

परळी, दि. 10 : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील वाढत्या कोरोना रुग्णासंख्येविरुद्ध कंबर कसली आहे. ना. मुंडेंच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परळीत सुरू केलेला सेवाधर्म उपक्रम आता आकार घेत आहे. या उपक्रमांतर्गत परळीत कोरोना बाधित रुग्णांना मोफत नाष्टा-भोजन पुरवणे, त्यांना आवश्यक रेमडीसीविर इंजेक्शन तसेच अन्य औषधी उपलब्ध करण्यासाठी प्रत्त्येक खाजगी रुग्णालयात दोन या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ना.मुंडे यांच्याप्रमाणेच आता इतर मतदासंघातील लोकप्रतिनिधींनी देखील सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे.
सोमवारी सेवाधर्म उपक्रमांतर्गत परळीतील पंचायत समिती शासकीय निवासस्थान या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र 100 बेडच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर महिलांसाठी मोफत असणार असून याठिकाणी सौम्य लक्षणे असलेल्या बाधित महिला रुग्णांवर उपचार करण्यात येतील.

मोफत सिटी बस व कोरोना सेफ्टी किट
परळीतील नागरिकांना वाहतूक निर्बंधांमुळे लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी बाधा येऊ नये म्हणून लसीकरण केंद्रावर ये-जा करण्यासाठी दोन मोफत सिटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना मुक्त होऊन आलेल्या रुग्णांना घरी स्वतःची व कुटुंबियांची काळजी घेता यावी यासाठी मोफत कोरोना सेफ्टी किट वाटप करण्यात येत आहेत. या किट मध्ये पल्स ऑक्सिमिटर, सॅनिटायझर, मास्क, साबण आदी बाबींचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी हेही विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्ण व नातेवाईकांसाठी काम करत आहेत. त्यात रुग्णांसाठी मोफत मोफत वाहन व्यवस्था, जनजागृती या माध्यमातून ते सक्रियपणे काम करत आहेत.

बाधित कुटुंबातील विवाहास आर्थिक मदत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत कोरोना बाधित गरीब व गरजू कुटुंबातील विवाहासाठी 10 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येत आहे, यासाठी गरजूंनी नाव नोंदणी करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत 4 कोविड केअर सेंटर उभारले
मतदारसंघातील घाटनांदूर येथे रा.कॉ.चे गोविंदराव देशमुख यांच्या माध्यमातून घाटनांदूर येथील आयटीआय येथे 50 बेडचे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर, ना. मुंडेंच्या संकल्पनेतून परळी ग्रामीण रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर, माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या सौजन्याने कै.पंडित अण्णा मुंडे 50 बेडचे कोविड केअर सेंटर तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्राम पंचायत यांच्या वतिने सिरसाळा येथे 50 बेडचे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

कोरोना योद्ध्याना विमा सुरक्षा कवच
परळीत कोरोनाचा सामना करणार्‍या सर्व कोरोना योध्याना सेवाधर्म अंतर्गत विमा सुरक्षा कवच मिळवून देण्यात येत असुन यासाठीही नियोजन केले जात आहे. सर्व आरोग्य सेवकांना मोफत टिफीन डबे देखील वाटप करण्यात येत आहेत.

धनुभाऊंचे सूक्ष्म नियोजन
बाधित रुग्णांना नाष्टा, भोजन ते अगदी रेमडीसीविर आहेत तिथेच उपलब्ध व्हावे इथपासून ते लसीकरण मोहीम वेगाने व निर्विघ्न पणे पार पडावी यासाठी ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड हे 24 तास सक्रिय राहून सूक्ष्म नियोजन करत आहेत तसेच संपूर्ण प्रक्रियेवर ना. मुंडे हे स्वतः लक्ष ठेऊन वेळोवेळी पदाधिकार्‍यांना सूचना देत असतात. सेवाधर्म अंतर्गत कोणतीही सहाय्यता आवश्यक असल्यास रा.कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, तसेच शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांना संपर्क साधावा असे आवाहन परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

Tagged