corona lasikaran

बीड : आणखी 30 हजार लस प्राप्त होणार

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड, दि. 9 : जिल्ह्याला आणखी 30 हजार लशींचा साठा प्राप्त होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली. या प्राप्त साठ्यातून प्रत्येक केंद्रास 400 डोस देण्यात येणार आहेत.
18 प्लससाठी देखील 8700 लस प्राप्त होत आहेत. त्यातून दररोज 200 जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

नोंदणी करण्यासाठी किती वाजता स्लॉट ओपन होणार ?
11 मे पर्यंतची 18 प्लससाठी सर्व नोंदणी पूर्ण झाली असून 12 मे पासूनच्या लसीकरण सत्राकरीता सोमवारी सायंकाळी 6 वाजता स्लॉट ओपन होत आहे.
तर 45 वर्षांपेक्षा जास्त नागरिकांनी 10 मे रोजी प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्यावी, असे प्रेसनोटमध्ये म्हटले आहे. त्यांचं लसीकरण 11 मे पासून सुरु होणार आहे.

सोबतची प्रशासनाची सुचना काळजीपुर्वक वाचा… आणि केंद्र काळजीपुर्वक निवडा

Tagged