लॉन, मंगल कार्यालयात करता येणार लग्न; ‘यांच्याकडून’ मिळणार परवानगी

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात आता लॉन, मंगल कार्यालयामध्ये लग्न करता येणार आहे. त्यासाठी पोलीस ठाण्यातून परवानगी मिळेल अशी माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आदेशान्वये दिली आहे.

रेखावार यांनी आदेशात पुढे म्हटले की, जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 50 लोकांच्या मर्यादेत लग्नाची परवानगी यापूर्वीच देण्यात आलेली आहे. परंतु पावसाळ्याच्या दिवसातील अनेकांच्या अडचणी लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी लॉन, मंगल कार्यालयासह सभागृह घराच्या परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन लग्न समारंभास परवानगी दिली आहे. यासाठीची परवागनी लग्न समारंभ ज्या ठिकाणी आहे, त्या हद्दीतील पोलीस ठाण्याकडून मिळणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

Tagged