माजलगाव दि. 27 : तालुक्यातील सोन्नाथडी येथील प्रगतशील शेतकरी असणारे रामराव गोविंदराव डक यांचे रविवारी (दि. 27) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील मंगलनाथ स्मशानभूमी मध्ये सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार गोविंदराव डक यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते. अँड.भानुदास डक व सुशील डक यांचे ते वडील होत. डक कुटुंबियांच्या दुःखात दैनिक कार्यारंभ परिवार सहभागी आहे.