RAJESH SALGAR

हरिभाऊ खाडेनंतर लाचखोर राजेश सलगरच्या घरातही सापडले घबाड!

बीड

रोख रक्कम, सोने, चांदी केली जप्त


बीड दि. 23 : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (police inspecter haribhau khade) यांच्या घर झडतीमध्ये एक कोटी रोख, एक किलो सोन्याची दागिने आणि पाच किलो चांदी असा मुद्देमाल सापडला होता. त्यानंतर काल परळीत केलेल्या कारवाईत कार्यकारी अभियंता राजेश सलगर (Executive engineer rajesh salgar) याची बीड एसीबीच्या (beed acb team) टीमने घरझडती घेतली असता मोठे घबाड सापडले आहे. (beed acb team)

राजेश सलगरच्या घरझडतीत सापडलेला मुद्देमाल जप्त करताना बीड एसीबी टिम..

पोलीस ठाणे परळी शहर कलम 7 , भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील मुख्य आरोपी राजेश आनंदराव सलगरकर, कार्यकारी अभियंता माजलगाव पाटबंधारे विभाग, परळी याचे आनंद नगर गंगणे यांचे घरी गजानन बिल्डिंग येथील किरायाचे राहते घरात 22 मे रोजी आरोपी सलगर व पंचासमक्ष घर झडती घेतली. (Executive engineer in ACB net) यावेळी झडतीमध्ये रोख रक्कम 11 लाख 78 हजार 465 रुपये, सोन्याची दागिणे एकुण 30 ग्रॅम किंमत अंदाजे 2 लाख 10 हजार रुपये व चांदी 3 किलो 400 ग्रॅम किंमत अंदाजे 2 लाख 72 हजार रुपये असा 16 लाख 60 हजार 465 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (karyarambh news) ही कारवाई उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, अंमलदार सुरेश सांगळे, सुदर्शन निकाळजे, स्नेहलकुमार कोरडे, गणेश मेहेत्रे यांनी केली. (karyarambh news)

राजेश सलगरच्या घरझडतीत सापडलेला मुद्देमाल जप्त करताना बीड एसीबी टिम..

Tagged