सख्ख्या चुलत भावांची जमीनीच्या बांधावरुन हाणामारी, एकाचा मृत्यू!

बीड


-गेवराई तालुक्यातील मानमोडी येथील घटना
गेवराई दि.23 ः शेतीच्या वादातून भाऊबंदकीत हाणामारी झाली, यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.23) सकाळच्या सुमारास गेवराई तालुक्यातील मानमोडी शिवारात घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. (GEVARAI POLICE STATION)

बापुराव रंगनाथ शेळमकर (वय 35) असे मयताचे नाव आहे. गेवराई तालुक्यातील मानमोडी येथील रंगनाथ शेळमकर आणि भुजंग शेळमकर या दोघा भावामध्ये शेतीच्या बांधावरून सतत वाद होत होते. सदरील वाद गावांतर्गत बैठका घेवून सरपंच व नागरिकांनी मिटवण्यासाठी बैठक टाकली होती. परंतु यामध्ये देखील तोडगा न निघल्याने त्यांच्यामध्ये बांधावरून सतत वाद होतच राहिले. शेत जमीनही बांधामुळे काही वर्ष पडीक ठेवण्यात आली होती. गुरुवारी वडील मंडळींचा वाद त्यांच्या मुलामध्ये सुरु झाला. शेतातच बाचाबाची झाल्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यातच भुजंग शेळमकर, तिर्थराज शेळमकर, उद्धव शेळमकर यांच्यासोबत बापूराव शेळमकर यांची हाणामारी झाली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी बीड येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Tagged