beed vakil

बीड न्यायालयात वाढदिवस साजरा, 11 वकीलांवर गुन्हा

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

वाढदिवस साजरा करणे महागात पडले

बीड  : येथील न्यायालयाच्या आवारात वाढदिवस (Birthday) साजरा करणे वकीलांना चांगलेच महागात पडले आहे. वाढदिवस साजरा करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 11 नामांकित वकिलांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     बीड जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण राख (pravin rakh) यांचा वाढदिवस मंगळवारी (दि.7) न्यायालयाच्या आवारात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी शारीरिक अंतराचे पालन न करणे, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणे यामुळे शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी फेरोज पठाण यांच्या फिर्यादवरुन अ‍ॅड.प्रवीण राख, अ‍ॅड.अविनाश गंडले, अ‍ॅड.भीमराव चव्हाण, अ‍ॅड.प्रभाकर आंधळे, अ‍ॅड.उद्धव रासकर, अ‍ॅड.श्रीकांत साबळे, अ‍ॅड.गोवर्धन पायाळ, अ‍ॅड.विकास बडे, अ‍ॅड.श्रीकांत जाधव, अ‍ॅड.विनायक जाधव, अ‍ॅड.रोहिदास येवले यांच्यावर कलम 51 (ब), 188, 269, 270, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास तात्यासाहेब बांगर हे करत आहेत. दरम्यान कायदेपंडितांकडून असे वर्तन होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Tagged