कोरोना गेल्यानंतर मी पुन्हा मैदानात येईल!

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र राजकारण

बीड : कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिगचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी घराबाहेर पडत नाही. मी बीड जिल्ह्यात जाण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यावेळी मला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी गर्दी होईल म्हणून येऊ नये अशा सूचना केल्या. कोरोना गेल्यानंतर मी पुन्हा मैदानात येईल असे विधान माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, तीन पक्षांचे राज्यात सरकार आहे. ती पक्ष एकत्रिक असल्यामुळे सरकार चालवणे कठीण आहे. परंतू शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. शिवसेनेसारखा पक्ष आहे. नेत्यांनी पक्ष, मतदारसंघ हा विचार न करता कॅबिनेट सुरु झाल्यानंतर राज्याचा मंत्री म्हणून प्रश्न हाताळले तर सरकार उत्तमरित्या चालविता येत. सुरुवातीस धारावीतील परिस्थिती राज्य शासनाने उत्तमरित्या हाताळली, तेव्हा आम्ही कौतूक केले. परंतू आता राज्यातील कोरोनाची आकडेवारी पाहता परिस्थिती बिकट आहे हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान वरळीत बसून परळीचे प्रश्न कसे सोडविणार? असा उद्वीग्न सवाल कार्यकर्त्यांनी केल्यानंतर पंकजाताई मुंडे म्हणाल्या, माझे कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहे. ते मला असा प्रश्न विचारणार नाहीत. परळीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मिस करत असतील तर मी परळीला लवकर येईल. सगळे प्रश्न परळीत बसूनच सुटत नाहीत. तसे असते तर कोरोना इतका वाढलाच नसता. माझ्या परिचयाचे तरुण कार्यकर्ते कोरोनामुळे गेले. जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रीतम मुंडे दर दहा दिवसाला बीडला असतात. त्यांनी स्वतः कोरोना वार्डात जाऊन रुग्णांची तपासणी केली आहे. अद्याप पालकमंत्री कुठल्याही हॉस्टिपलला भेटायला गेले नाहीत असे म्हणत राज्याच्या प्रश्नावर चर्चा करायला बोलावल्यानंतर काही कार्यकर्ते असे प्रश्न विचारून इंटरव्ह्यू खराब करत आहेत असे त्या म्हणाल्या. दरम्यान, या कार्यक्रमात त्यांनी ऊसतोड मजूरांचे प्रश्न व्यवस्थित हाताळणार आहे. मराठा, धनगर आरक्षण हे मुद्दे महत्वाचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

Tagged