kaij crime in deer beaf

दुकान मांडून हरिणाच्या मांसाची विक्री तरुणावर गुन्हा दाखल

क्राईम बीड

केज :  तालुक्यातील बनसारोळा येथील पारधी वस्तीवर शुक्रवारी एका हरीणाची शिकार करून मांस विक्री करत असल्याची खबर मिळाल्या वरुन धारूर वनविभागाने कारवाई करत मुद्देमाल हस्तगत करत एका आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला.
        धारुर वनक्षेत्रपाल विभागाचे विभागीय वन अधिकारी एम.बी.तेलंग, वन परिक्षेत्राधिकारी एम.एस.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एम एम.कांबळे, वनरक्षक एल.जी. वरवंटे, श्रीमती कांबळे, वनरक्षक संभाजी पारवे व पोलीस शेख, युसुफ वडगाव एपीआय डोळे, जमादार यांच्या सह सदर ठिकाणी पारधी वस्तीवर जाऊन शुक्रवारी धाड मारली. यावेळी पथकाला पाहताच काही लोक पळून गेले. त्यांच्या घराची झडती घेतली असता त्याठिकाणी मटन, लाकडी ठोकळा, एक टोपले, तराजू, एक सुरा, लोखंडी सत्तुर, जाळे, वाघुर मिळून आले ते सर्व यांच्यासमक्ष जप्त करून ताब्यात घेतले. सदरील प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलमान्वये युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. आरोपी अनिल देविदास काळे (रा.बनसारोळा) हा फरार आहे. 

आरोपी विरुद्ध वरील कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. वन्यप्राण्यांची विशेषतः हरीण, मोर, ससे यांची शिकार करुन मांस विक्री करण्याचे प्रकार वाढले असून, सदरील कारवाईमुळे अशी शिकार करणार्‍यांना चांगलीच चपराक बसली आहे.

Tagged

1 thought on “दुकान मांडून हरिणाच्या मांसाची विक्री तरुणावर गुन्हा दाखल

Comments are closed.