एकाच दिवशी चार पोलीसांचा मृत्यू

क्राईम महाराष्ट्र

मुंबई : कोरोनाकाळात कायदा सुव्यवस्था सांभाळणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज एकाच दिवशी तब्बल चार पोलीसांचा मृत्यू झाला. कोरोना योद्ध्यांचा अशा प्रकारे मृत्यू होत असल्याने पोलीसांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

एकाच दिवशी मुंबईत चार पोलीस कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बोरिवली, वाकोला आणि दिंडोशी या पोलीस ठाण्यांमध्ये हे कर्मचारी तैनात होते. मुंबईत आतापर्यंत 26 पोलीस कर्मचार्‍यांनी कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात मागील दोन दिवसात 129 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलीस कर्मचार्‍यांची संख्या 3 हजार 388 इतकी झाली आहे.

राज्यात आत्तापर्यंत 40 पोलिसांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 388 पैकी आत्तापर्यंत 1945 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged