बीड ग्रामीण पोलिसांनी गुटखा पकडला!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


टेम्पो, झायलो कारसह दोघे ताब्यात

बीड : दि.14 : रात्र गस्तीवर असलेल्या बीड ग्रामीण पोलिसांनी नामलगाव फाटा परिसरात मंगळवारी (दि.14) पहाटेच्यासुमारास गुटखा पकडला. यावेळी टेम्पो, झायलो कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
बीड ग्रामीण पोलीस रात्र गस्तीवर असताना नामलगाव फाटा परिसरामध्ये टेम्पोत गुटखा असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याचे दहा ते पंधरा पोते आढळून आले. याप्रकरणी टेम्पो व झायलो कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवनकुमार राजपुत व इतर कर्मचारी यांनी केली. या कारवाईने गुटखा माफियामध्ये खळबळ उडाली आहे. या गुटख्याचा मुख्य मालक कोण? याचा तपास बीड ग्रामीण पोलिस करत आहे.
ग्रामीण पोलिसांनी गुटखा पकडला!
टेम्पो, झायलो कारसह दोघे ताब्यात
बीड : दि.14 : रात्र गस्तीवर असलेल्या बीड ग्रामीण पोलिसांनी नामलगाव फाटा परिसरात मंगळवारी (दि.14) पहाटेच्यासुमारास गुटखा पकडला. यावेळी टेम्पो, झायलो कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
बीड ग्रामीण पोलीस रात्र गस्तीवर असताना नामलगाव फाटा परिसरामध्ये टेम्पोत गुटखा असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याचे दहा ते पंधरा पोते आढळून आले. याप्रकरणी टेम्पो व झायलो कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवनकुमार राजपुत, पोह.लोणके, अतिष मोराळे, अंकुश वरपे, चालक कृष्णात बडे इतर कर्मचारी यांनी केली. या कारवाईने गुटखा माफियामध्ये खळबळ उडाली आहे. या गुटख्याचा मुख्य मालक कोण? याचा तपास बीड ग्रामीण पोलिस करत आहे.

Tagged