nath sagar, jaykwadi prakalp

नाथसागरातून विसर्ग वाढवला

न्यूज ऑफ द डे मराठवाडा

18 दरवाजे 2 फुटांनी उचलले

पैठण, दि.13 : पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या आठ दिवसापासून कमी अधिक मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे या धरणाची पाण्याची आवक रविवारी रात्री वाढली. त्यामुळे पुर्वीपासून सुरु असलेले 18 दरवाजे दोन फुटांनी उचलण्यात आले. त्यामुळे आता गोदावरीत 37500 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येऊन तो आता 39,628 क्यसेक करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.

पाटबंधारे विभागाकडून धरणाची पाण्याची टक्केवारी 98.40 कायम ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत. रविवारी रात्री पाण्याची आवक 22912 क्युसेक वाढली. त्यामुळे सुरुवातीला दीड फूट सुरू असलेले 18 दरवाजे दोन फूट उंच वाढवून गोदावरी नदीमध्ये 39628 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. सध्या धरणाची 1521.87 फूट पाणी पातळी आहे. त्यामुळे टक्केवारी 99.28 इतकी नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नाशिकमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नाथसागर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलेला आहे.

Tagged