accident

बैलगाडीवर दुचाकी आदळली; दोघे ठार

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गावरील घटना

अंबाजोगाई : उभ्या असलेल्या बैलगाडीला दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होऊन दोघे ठार झाले. ही घटना शुक्रवारी (दि.10) सायंकाळी 7 वाजता अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गावर उजनीपाटी जवळ झाला.
सुरेश नरहरी गायकवाड (वय 45, रा. किनगाव) व शेख जावेद शेख अल्लाबक्ष उर्फ पेंटर (वय 38, रा. किनगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. धर्मापुरी येथील लग्न आटोपून ते दोघे सायंकाळी दुचाकीवरून (एमएच 24 ए झेड 9761) किनगावकडे निघाले होते. सायंकाळी सात वाजता ते उजनीपाटी जवळ आले असता रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बैलगाडीला त्यांनी पाठीमागून भरधाव वेगात धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले, त्यांना येथील स्वाराती रूग्णालयात उपचारार्थ आणले होते. परंतु त्यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Tagged