beed cyber raid

बीड सायबर पोलीसांची चक्री जुगारावर धाड!

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा


नऊ जुगारी ताब्यात; पावने तीन लाखांचा मुद्देमाल जप्त (beed cyber police raid)
बीड
दि.14 : पाटोदा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाईन चक्री जुगाराच्या अड्ड्यावर बीड सायबर पोलीसांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास धाड टाकली. यावेळी नऊ जुगार्‍यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 2 लाख 81 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Cyber police attack gambling!)

पाटोदा येथील बसस्थानक (patoda bustand) परिसरात ऑनलाईन चक्री जुगार (Cyber police attack gambling!)) सुरु होता. यावर धाड टाकत नऊ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोबाईल, दोन लॅपटॉप, इनटरनेट मोडेम, तीन दुचाकी व रोख रक्कम असा 2 लाख 81 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, (sp nandkumar thakur) अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर ठाण्याचे निरीक्षक रवि सानप, उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, महिला उपनिरीक्षक निशीगंधा खुळे, पोह.बप्पासाहेब दराडे, अशिष वडमारे, विजय घोडके, अनिल डोंगरे, श्रीकांत बारगजे, प्रदिप वायभट, अमोल दरेकर, अजय जाधव यांनी केली. (beed cyber police team)

Tagged