बीड शहर 9 जुलैपर्यंत बंद

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : गत पंधरा दिवसात आढळलेल्या कोरोनाग्रस्तामध्ये शहरातील जास्त रुग्ण आहेत. शहरात बुधवारी आढळून आलेले तीन रुग्ण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकांच्या संपर्कात आल्याचा प्रशासनाचा संशय असल्यामुळे बीड शहर 8 दिवसांसाठी (दि.9 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत) लॉकडाऊन असणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मंगळवारी रात्री दिले आहेत.

    शहरात आढळून आलेल्या तीन रुग्णांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकांशी संपर्क आल्याचा प्रशासनाचा संशय आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी शहरातील इतर भागामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार शहरात संपूर्ण संचारबंदी घोषित करत कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत.

खालील निर्देशांचे पालन करावे लागणार आहे
-वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा 24 तास सुरु राहतील.
शहरात विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही व शहरा बाहेरही जाता येणार नाही.


-अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळता (महसूल, पोलीस, ग्रामविकास, नगरविकास, कृषी व आरोग्य शहरातील सर्व आस्थापना, बँका (शासकीय व खाजगी आस्थापना इ.) बंद राहतील. वरील 6 विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राद्वारे शहरांतर्गत प्रवास करू शकतील.

-शहरातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही. परंतु मेडिकलमधील पाससाठी बीड शहरातील नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करावेत.

-नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप तात्काळ डाऊनलोड करुन वापरणे बंधनकारक आहे.
शहरात फक्त फिरते दुध विक्रेते यांना परवानगी राहिल. कोणतेही दुकानदारामार्फत दुध विक्री केली जाणार नाही अथवा दुकान उघडणार नाही. त्यांनी दुधाची पॉकिटे होम डिलीवरी करावी. व ती परत करत असताना कोव्हिड 19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे.

-जार वॉटर वाटप न करता ग्राहकांकडील उपलब्ध भांड्यात पाणी घ्यावे. भाजीपाला, फळे विक्रेत्यांनी घरोघरी जाऊन भाजी विक्री करावी.

-घरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीया गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेले कर्मचारी यांनी नियमानुसार पारिधान करावा.

-मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांच्या कर्मचार्‍यांनी नियमानुसार पास काढून सेवा दयावी.
वैद्यकीय कर्मचारी य औषधी विक्रेते यांनी दवाखान्याचे ओळखपत्र अथवा ऑनलाईन

-पास ऑनलाईद्वारे बीड शहरांतर्गत प्रवासासाठी परवानगी देण्यात येत आहे.
-जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणेवावतचे आदेश स्वतंत्र काढण्यात येतील.

Tagged