20 मानकर्‍यांनी पांडुरंगाचे दर्शन दिल्याशिवाय माघारी फिरणार नाही

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

पैठण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मानाच्या पालखीत 20 मानकरी वारकर्‍यांना सर्व वैद्यकीय चाचणी केल्यानंतर आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली. मात्र केवळ यातील 5 वारकर्‍यांना पंढरपूर प्रशासनाने दर्शनाची परवानगी दिली आहे. त्यामुळे वारकर्‍यांनी पंढरपूर येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मठामध्ये बुधवारी बैठक घेतली. 20 मानकरी वारकर्‍यांना पांडुरंगाचे दर्शन न दिल्यास माघारी पालखी सोहळा फिरणार नाही असा इशारा पंढरपूर प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आषाढी वारी सोहळ्याचा पारंपारिक काल्याच्या कार्यक्रमापर्यंत पालखी सोहळा मुक्कामी राहतो का नाही? असा पेच निर्माण झाला आहे.

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर अपर जिल्हाधिकारी मनोज पाटील यांनी पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त गर्दी होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करून पंढरपुरात संचारबंदी लागू केली. चंद्रभागा वाळवंटात देखील वारकर्‍यांना निर्बंध लावण्यात आले आहेत. आषाढी सोहळ्याच्या परंपरेनुसार एकादशीनंतर काल्याचा कार्यक्रम संपन्न होतो. त्यानंतर विठ्ठल रुक्माई आषाढी वारी सोहळ्यामध्ये सहभाग झालेले विविध संतांचे सोहळा आपापल्या गावाकडे परतीचा प्रवास करतात. पंढरपूर तालुका प्रशासनाने गुरुवारी उपवास सोडल्यानंतर पंढरपुर येथून महाराष्ट्रातून आलेले विविध संस्थाचे सोहळे वापस परत लावण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. त्यामुळे पंढरपूर प्रशासन व पालखी प्रमुखांचा या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बैठकीला संत एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विकास ढगे पाटील, ज्ञानेश्वर महाराज संस्थान प्रमुख योगेश देसाई, निवृत्तीनाथ संस्थानचे संजय नाना धोंडगे, मुक्ताआई संस्थानचे रवींद्र पाटील, रविंद्र महाराज हरणे यांच्यासह अन्य महाराज मंडळी उपस्थित होते.

Tagged