मनसेचा ऊर्जामंत्र्यांना ‛झटका’

केज न्यूज ऑफ द डे बीड

केजमध्ये पोलिसात तक्रार : वीज ग्राहक फसवणूक प्रकरण

केज : बीड जिल्ह्यासह राज्यभरातील वीज ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. याप्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केज पोलिसात मंगळवारी (दि.२६) तक्रार दाखल करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

सामान्य लोकांना वीज बिलांचा त्रास होत आहे. खोटी बिले देऊन मनस्ताप दिला जातो. वीज बिल माफीची घोषणा करून घुमजाव केले जाते. लॉकडाऊन काळातील वीज बिल सक्तीने वसूल करण्याचा इशारा महावितरण कंपनीकडून दिला जात आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि वीज कंपन्यांचे संचालक यांच्यावर वीज ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी केजचे पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत, केजचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमंत धस, मनसेचे केज तालुकाध्यक्ष कल्याण केदार, गोविंद हाके यांची उपस्थिती होती.

Tagged