बेपत्ता तरुणाचा खून

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

  पैठण  दि.28 : घरातून बेपत्ता असलेल्या 30 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना पैठण शहरात घडली आहे. दोन दिवसापूर्वी सदरील तरुण जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पैठण पोलीस करत आहेत.
पैठण शहरातील नवे कावसान भागातील योगेश निवारे (वय 30) असे मयत तरुणाचे नाव आहे. योगेश हा दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेला होता. नातेवाईक व पोलीस शोध घेत असतानाच शासकीय रुग्णालयात योगेशला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या अंगावर जखमा झालेल्या असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यातील आरोपी कोण? कुठल्या कारणामुळे खून झाला? यासह आदी माहिती रात्री पोलीसांकडून दिली जाणार आहे. घटनास्थळी पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे आदींनी धाव घेतली असून अंत्यविधीनंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

Tagged