acb trap

बीडमध्ये 900 रुपयांची लाच घेताना कर्मचारी पकडला!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि. 10 :येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक 900 रुपयांची लाच व 600 रुपये फिस घेताना रंगेहाथ पकडला. सोमवारी (दि.10) सायंकाळी बीड एसीबीने ही कारवाई केली.

विनोद गिरीधर मुनेश्वर (वय 32) असे बीड सह जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे. तक्रारदार यांचे आईचे नावावरील जमीन तक्रारदार यांचे नावावर करण्याबाबत गेवराई कोर्टाचे आदेश झाल्याने त्याकरिता सह जिल्हा निबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क भरून पावती व हुकूमनामा प्रमाणित करून देण्यासाठी मुनेश्वर यांनी पंचासमक्ष एकूण 1500 रुपयांची मागणी करून त्यांचे जिल्हा सह निबंधक कार्यालयात पंचासमक्ष लाच रक्कम स्वीकारली. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार भरत गारदे, हनुमान गोरे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.

Tagged