बीड जिल्हा : आज ५०९ पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

सलग चार दिवसांपासून बाधितांचा टक्का १० च्या आत

बीड : जिल्ह्यात रविवारी (दि.३०) कोरोनाचे ५०९ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, सलग चार दिवसांपासून बाधितांचा टक्का १० च्या आत आला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाबत जिल्हावासीयांची चिंता कमी झाली.

जिल्ह्यातून शनिवारी ४७९१ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले, त्यामध्ये ५०९ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ४२४८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक १२१, अंबाजोगाई ३१, आष्टी १०२, धारूर १७, गेवराई ४८, केज ५४, माजलगाव ३७, परळी ८, पाटोदा ३८, शिरूर ३२ तर वडवणी तालुक्यात २१ रुग्ण आढळून आले. दरम्यान, प्रतिदिवस आढळणारी रुग्णसंख्या दीड हजारांवरून पाचशेच्या आली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Tagged